भुसावळ : शहरातील मौजे साकेगाव शिवारात विठ्ठल – रुखमाई मंदिर आणि परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी प्रादेशिक पर्यंटन विकासकामांतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे तत्काळ सुरू करण्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाला नियोजन विभागाने पत्र पाठवून अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. या मंदिर परिसरात सुशोभीकरण व्हावे याची मागणी शहरातील नागरिकांनी केली होती. या कामासाठी मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केल्यामुळे गावकर्यांनी आभार मानले आहेत.