मालेगाव : येथील प्रख्यात उद्योजक आणि श्यामसुंदर जुगलकिशोर ऑईलमिलचे मालक शामभाऊ जाजू यांचे बुधवार, दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी निधन झाले. 19 ऑक्टोबर रोजी त्यांना ऑईल मिलमधून घरी जाताना किरकोळ अपघात झाला होता. मालेगाव येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथील सीएनएस हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारार्थ दाखल केले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. शामभाऊ यांच्या पश्चात पत्नी चंदा, मुलगी शिल्पा, जावई दिनेश सारडा, सून अनुश्री, नात निसा, वनिसा, भाऊ प्रकाश जाजू, वहिनी सौ. रश्मी प्रकाश जाजू, नारायण जाजू, सौ. सुष्मा नारायण जाजू, पुतणे कुणाल, रैना, करण, प्राची असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंतिम यात्रा गुरुवार, दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता, मालेगाव येथील ‘रामकुटी’ एसआरपी कॅम्प रोड, कॅम्प कॉर्नर, या त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.