पिंपळगाव हरेश्वरातील सभेत हल्लाबोल; वैशालीताईंना जिंकवण्याचे आवाहन
पाचोरा (प्रतिनिधी ) : देशातील सध्याचे वातावरण पाहता संविधान वाचवायचे असेल तर महाविकास आघाडीला विजयी करा असे आवाहन ख्यातनाम वक्ते प्रा. नितीन बानुगडे यांनी केले. ते पिंपळगाव हरेश्वर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलत होते.
याप्रसंगी नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले की, “मी याआधी देखील येथे येऊन गेलेलो आहे, पण मातोश्री सोबत गद्दारी झाली असून वैशालीताई सुर्यवंशी या उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिलेले आहेत. यामुळे आपणा सर्वांना निष्ठावंत वैशालीताई यांना निवडून द्यायचे आहे. विद्यमान सत्ताधारी ही भांडवलदारांची पाठीराखे असून शेतकऱ्यांचे मारेकरी असल्याची घणाघाती टीका, त्यांनी याप्रसंगी केली. ते म्हणाले की, सर्व वस्तूंच्या किंमती वाढत असताना देखील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कपाशीला ११ हजार रूपयांचा भाव मिळत असताना आज तो फक्त