नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार हे थ्रोट इन्फेक्शनमुळे कार्यकर्त्यांच्या संपर्कात नव्हते. राज्यभरातून अनेक प्रमुख कार्यकर्त्य अजितदादा यांच्या भेटीसाठी नागपुरात आले होते. बुधवारी अजित दादा हे नागपुरात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होते. सर्वांचे अभिनंदन स्वीकारून दादांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. धुळे येथील महापालिकेचे माजी सभापती अनिल मुंदडा यांनीही नागपुरात अजित पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले.