भुसावळ कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जळगांव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर विभागीय मैदानी स्पर्धा एम् जे कॉलेज जळगाव येथे दिनांक 9-10 डिसेंबर रोजी संपन्न झाल्या त्यात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडू कुमारी सुजल महेंद्र शुक्ला एस वाय बी सी ए हिने गोळा फेक, थाळी फेक प्रकारच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला त्यामुळे भुवनेश्वर ओरिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धा साठी विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स महिला संघात पात्र होऊन निवड झाली सदर स्पर्धा दिनांक 26 ते 30 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होणार आहे
वरील यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ राजू फालक यांनी सत्कार केला यावेळी प्रा डॉ संजय चौधरी प्रा डॉ जे बी चव्हाण, प्रा डॉ जयश्री सरोदे उपस्थित होते
वरील यश संपादन केल्याबद्दल विद्यापीठ क्रीडा संचालक, प्रा डॉ दिनेश पाटील, निवड समिती सदस्य प्रा डॉ पी आर चौधरी, प्रा डॉ शैलेश पाटील, प्रा विनिश चंद्रन तसेच महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य प्रा डॉ ए आर सावळे प्रा एस डी चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.