शशांक मराठे,पारोळा
पारोळा : येथील डॉ. राजकुमारी सुरेश जैन यांचे मोठे भाऊ गजेंद्र बरमेच्या वय ७०, यांचे इंदोर येथे नुकतेच निधन झाले. त्यांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या परिजनांनी, स्व. गजेंद्र यांचे डोळे, नेत्रपतपेढीस, नेत्रदान केले.
▪️ गेल्या बारा वर्षापासून डॉ. राजकुमारी जैन या नेत्र व अंगदान चळवळीसाठी काम करीत आहेत. त्या अखिल भारतीय मारवाडी महिला संघटन या संघटनेसाठी त्या नेहमी सक्रिय असतात. नेत्रदान, अंग, त्वचा आणि देहदान याविषयी चे महत्त्व त्या आपल्या प्रत्येक कार्यक्रमातून पटवून देत असतात. त्यामुळेच त्यांच्याच परिवारातील त्यांची आई कमलादेवी बरमेचा, दुसरे मोठे भाऊ दिनेश बरमेचा, इंदोर यांनी नेत्रदान संकल्प करून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
▪️ नेत्र व देहदान चळवळीच्या वतीने दिवंगत गजेंद्र बरमेचा, यांच्या परीजणांना सन्मानपूर्वक सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. हे सन्मानपत्र दिवंगत गजेंद्र यांचे मोठे चिरंजीव अमित बरमेचा यांनी स्वीकारले. स्वर्गीय गजेंद्र यांचे आयुष्य सरलता, सहजता, पुरुषार्थ पूर्वक जीवन सार्थ सत्कारणी लागले. त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा. असे गौरव उद्गार काढले. तसेच त्यांना आदरांजली वाहण्यात आली.