न्हावी ता यावल वार्ताहर -श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयास मुंबईच्या वनिता बुक्स प्रकाशनाकडून सार्वजनिक वाचनालय भुसावळचे ग्रंथपाल नितीन तोडकर व सहयोगी ग्रंथपाल अवधूत दामोदरे यांच्यामार्फत महायोगी ,दत्ता अवधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती, श्री दत्ता अवधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र श्री दत्तलीलामृत- श्री सिद्ध लीलामृत, मानवी जीवनातील गुढ रहस्य एकूण भाग सात, श्री दत्त दुर्गा संवाद ,भारतीय गुढ विद्या, श्री दुर्गा सप्तशती, ईश्वर भक्तीचे अनुभव , श्री दुर्गा त्रि शती , श्री दत्त गीता, आत्मसिद्धी अर्थात ईश्वर प्राप्तीचा सुलभ मार्ग, जीवन मुक्तीचा मार्ग, ईश्वर प्राप्तीचा मार्ग, विहंगम मार्ग, अगम्यवाणी व अमरत्वाकडे वाटचाल ही पुस्तके श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे ग्रंथपाल ललित इंगळे , सचिव युवराज तळेले, संचालक ललित कुमार फिरके यांच्याकडे देण्यात आली. प्रसंगी द शि विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस पी पाटील, सार्वजनिक वाचनालय भुसावळ चे संचालक हरीश पाटील उपस्थित होते. पुस्तके भेट दिल्याबद्दल सचिव युवराज तळेले यांनी वनिता बुक्स प्रकाशन यांचे व नितीन तोडकर यांचे आभार मानले.
Home ताज्या बातम्या न्हावीच्या श्री गणेश सार्वजनिक वाचनालयास मुंबईच्या वनिता बुक्स प्रकाशनाकडून पुस्तकांचा संच...