जनशक्ती न्यूज नेटवर्क
पारोळा…येथील पारोळा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक नितीन सोनार, कार्याध्यक्ष पदी प्रतिक मराठे, उपाध्यक्ष माजी नगरसेवक मनोज जगदाळे, अशोककुमार लालवाणी, सचिव माजी नगरसेवक मनिष पाटील खजिनदार रोशन गुजराती यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
महासंघाचे मावळते अध्यक्ष केशव क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. व्यापारी हा समाजाचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे समाजाचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी ग्राहक व व्यापारी यांच्यातील समतोल टिकविणे हे महासंघाचे काम आहे आणि हे काम नवनिर्वाचित पदाधिकारी सातत्याने पुढे नेतील अशा शुभेच्छा याप्रसंगी केशव क्षत्रिय यांनी दिल्या.
प्रमुख उपस्थितीत
याप्रसंगी संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण नारायण वाणी, दिनेश गुजराती विलास एकनाथ वाणी, महेश हिंदुजा, मिलिंद विसपुते, संजय कासार, योगेश सोनार, सुनील भालेराव यांच्यासह विविध व्यवसायातील व्यापारी उपस्थित होते.